सांगली मानांकनात देशात प्रथम क्रमांकावर
सांगली, दि. 18, सप्टेंबर -, 17 सप्टेंबर, (हिं. स) : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मध्ये स्वच्छता दर्पण मानांकनात सांगली जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आला आहे. सांगली जिल्ह्याने 158 व्या स्थानावरून थेट प्रथम क्रमांकावर झेप घेतलेली आहे. सांगलीसह देशातील 11 जिल्हे संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत.
केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने स्वच्छ भारत मिशनतर्ंगत सांगली जिल्ह्याचे मानांकन सुरू आहे. त्यासाठी 100 गुण निश्चित केले आहेत. हागणदारीमुक्त गाव, शौचालये व शौचालय सुविधांसाठीचे प्रयत्न यासाठी 50 गुण आहेत. या मिशनमध्ये सातत्य, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यासाठी 25 गुण आहेत, तर हागणदारीमुक्त गावांची पडताळणी, फोटो अपलोड व आधार मॅपिंग यासाठी 25 गुण दिले आहेत. सांगली जिल्ह्याने या तीनही प्रकारात अनुक्रमे 50, 15 व 25 गुणांसह 90 गुण मिळवले आहेत.
या अभियानातर्ंगत प्रथम मानांकन मिळविण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्रीमती दीपाली पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी सांगली जिल्हा या मानांकनात देशात 158 व्या क्रमांकावर होता. त्यानंतर चार दिवसापूर्वी देशात 13 व्या क्रमांकावर झेप घेतली व आता सांगली जिल्हा हा देशातील इतर 11 जिल्ह्यांसमवेत संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहे. या प्रथम क्रमांकावर महाराष्ट्रातील अन्य कोणताही जिल्हा नसल्याने आपसूक सांगली जिल्हा राज्यातही प्रथम क्रमांकावर राहणार आहे. या अभियानाअंतर्गत दि. 25 सप्टेंबरनंतर अंतिम मानांकन जाहीर केले जाणार असून विजेत्या जिल्ह्याचा दि. 2 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे विशेष गौरव करण्यात येणार आहे.