Breaking News

पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधन व्यवस्था तयार करा - नितीन गडकरी


नवी दिल्ली,दि.8 : पेट्रोल व डिझेलसारख्या पारंपारिक इंधनावर चालणा-या वाहनांसाठी वाहन कंपन्यांनी पर्यायी इंधन व्यवस्था तयार करावी अन्यथा त्या नंतरच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिला. पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधन देणे ही काळाची गरज आहे, असेही गडकरी म्हणाले. प्रदूषण नियंत्रण व वाहन आयातीवर निर्बंध आणण्यासाठी मंत्रालयाकडून करण्यात येणा-या प्रयत्नांसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. इलेक्ट्रीक वाहनांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोरील प्रस्ताव तयार आहे. यामध्ये चार्जिंग स्थानकांवर लक्ष दिले जाईल. हा प्रस्तावाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असेही गडकरी यांनी सांगितले.