Breaking News

माजी केंद्रीय राज्यमंत्री सुल्तान अहमद यांचे निधन

नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - माजी केंद्रीय राज्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्य सुल्तान अहमद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 67  वर्षांचे होते. डोके दुखू लागल्याने त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी पर्यटन  राज्यमंत्री पद सांभाळले होते.
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुलतान अहमद यांच्याबरोबर दीर्घकाळ काम केले. त्यांच्या  निधनाचे वृत्त दु:खदायक असून या वृत्ताने धक्का बसला असल्याचे ट्विट ममता यांनी केले आहे. अहमद यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचेही त्यांनी  ट्विटमध्ये म्हटले आहे.