Breaking News

जेपी इन्फ्राटेक ला दिवाळखोर घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - जेपी इन्फ्राटेक या बांधकाम व्यावसायिक कंपनीला दिवाळखोर घोषित करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती  दिली. राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने या कंपनीला 9 ऑगस्ट रोजी दिवाळखोर घोषित करण्याचे आदेश दिले होते. या पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर रोजी  होणार आहे.
जेपी ला दिवाळखोर घोषित करण्याच्या प्रकियेला सुरुवात झाली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी जेपी बिल्डर्स , रिझर्व्ह बँक व अन्य संबंधितांना  नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
जेपी इन्फ्राटेक विरोधात दिवाळखोरी व कर्ज परतफेड करण्यास असक्षमता कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत उपरोक्त  कायद्यालाही आव्हान देण्यात आले आहे. हमी न देणा-या कर्जदारांमुळे घर व पैसे परत मिळणार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 24 सदनिका धारक  मालकांच्या वतीने वकील अजित कुमार सिन्हा यांनी याचिका दाखल केली आहे.