Breaking News

उच्च न्यायालयाने हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली, दि. 27, सप्टेंबर - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमची निकटवर्तीय हनीप्रीतला दिल्ली हायकोर्टाने दणका दिला आहे. राम रहीमला शिक्षा  सुनावल्यानंतर फरार झालेल्या हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.
जीवाला धोका असल्यामुळे हनीप्रीत समोर येत नसल्याचं तिच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर कोर्टाने हनीप्रीतला सुरक्षा पुरवण्याचं आश्‍वासन देण्याच्या  अटीवर समोर येण्याचे आदेश दिले. हनीप्रीत येत्या दोन दिवसात समोर येण्याची शक्यता आहे. ‘माझ्या जीवाला धोका आहे. मी बालपणापासूनच डेर्‍याशी जोडली  गेले आहे. राम रहीमची मुलगी असणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हरियाणा पोलिसांनी माझं नाव वॉण्टेड लिस्टमध्ये टाकलं आहे.’ असं हनीप्रीतने तिच्या  अटकपूर्व जामीन अर्जात म्हटलं आहे.