मनपा जागा लिलावात जादा बोली केली म्हणून जातीवाचक शिवीगाळ...
गुन्हा दाखल करण्यास प्रारंभी नकार देणारे नाशिक पोलीस जनरेट्यासमोर नमले अखेर मारहाणीच्या गुन्ह्यासह अॅट्रासीटी दाखल
कुमार कडलग/नाशिक । 18 - भाजपाशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी कायदा धाब्यावर बसविण्याचा परवाना पोलीस यंञणेने दिला असल्याची चर्चा शहरात आहे.ससत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्यांनी केलेले बेकायदेशीर कृत्य दुर्लक्षित करण्याचे काम नाशिक पोलीस चोखपणे बजावत आहेत.गणेशोत्सव काळात भाजपशी संबंधित एका पदाधिकार्याने बेकायदेशीर सोडत योजना राबवून हजारो गणेशभक्तांची लाखो रूपयांची फसवणूक केली.या संदर्भात भद्रकाली पोलीसात तक्रार अर्ज दाखल झाला गणेशोत्सवाच्या काळात बी.डी.भालेकर मैदानावर बंदोबस्तास असालेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांसमोर ही फसवणूक सुरू होती.इतकेच नाही तर पालकमंञी गिरीश महाजन यांनीही राञी उशिरा म्हणजे गणेशदृय बंद झाल्यानंतर सोडता कुपन क्रश केले.या बेकायदेशीर सोडत संदर्भात एव्हढे सारे पुरावे उपलब्ध असतांना भद्रकाली पोलीसांकडून तक्रार अर्जावर कुठलीही कारवाई झाली नाहीयावरून नाशिक पोलीस सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांवर विशेष मेहेरनजर दाखवित असल्याची चर्चा शहरात आहे.काळाराम मंदिर सत्याग्रहाची ऐतिहासिक पार्श्वभुमी असलेल्या नाशिकच्या पावन भुमीत आजही पददलित आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुठल्याही जातीधर्माच्या व्यक्तीला न्यायासाठी झगडावे लागते याचा अनुभव पुन्हा एकदा मनपाच्या जागा लिलावप्रक्रीयेनंतर आला.
ग्राम दैवत असलेल्या कालिका माता नवराञ उत्सवा दरम्यान दरवर्षी मुंबई नाका परिसरात देवी मंदिरा जवळ असलेल्या मनपाची मालकी असलेल्या जागेवर याञेकरूंच्या विशेषतः लहान मुले ,तरूण तरूणी यांच्या विरंगुळ्यासाठी पाळणेवजा खेळणे लावली जातात.त्यासाठी मनपा प्रशासन दरवर्षी जागेचा लिलाव प्रृक्रीया राबविते. राजकारणात असलेले वर्चस्व ,मनपा प्रशासनात असलेला दबदबा या जोरावर या जागेचा लिलाव एकाच गटाला मिळण्याचा पायंडा गेली अनेक वर्ष सुरू होता.या पायंड्याला दिपक डोके नामक पाळणे खेळण्याचा व्यवसाय असलेल्या तरूणाने लिलाव प्रक्रीयेत भाग घेऊन आव्हान दिले. दिपकच्या लिलावातील सहभागाने वरचढ बोली लागली आणि मागील वर्षाच्या चार लाखापासून सुरू झालेली बोली दहा लाखापर्यंत पोहचली.लिलाव ऐन रंगात आला असतांनाच प्रशासनातील कुणा वरिष्ठ अधिकार्याने लिलाव अधिकार्याला दहा मिनिट लिलाव प्रक्रीया थांबविण्याचा आदेश फोनवरून दिला.ब्रेककाळात लिलावात भाग घेतलेला तरूण दिपक डोके हा हा एका बाजूला उभा असतांना प्रतिस्पर्धी गटातील एका तरूणाने त्याला जवळ बोलावून घेतले आणि त्याच्या जातीचा उल्लेख करून तुम्ही+++ प्रत्येक ठिकाणी घाण करता ..आम्ही तुमच्या आंबेडकर जयंतीत येतो का ..अशी जातीवाचक भाषा वापरून एकाने पाठीमागून चापट मारली तर दुसर्याने कंबरेत लाथ मारली.दोघा तिघांनी मारहाण केल्याचे हे दृश्य मनपाच्या सीसीटीव्ही कमेर्यात कैद झाले आहे.हा प्रकार शुक्रवार,दि.15 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा वाजेच्या दरम्यान घडल्यानंतर दिपक डोके याने सरकार वाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याची विनंती केली.तथापी कर्तव्य बजावणार्या संबंधित पोलीस यांञणेने फिर्याद घेण्यास स्पष्ट शब्दात नकार देऊन वैद्यकीय मदतही नाकारल्याचा आरोप दिपकने केला आहे.त्यानंतर दिपक स्वतः उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल झाला .ही वार्ता वार्यासारखी प्रसार माध्यमामध्ये तासेच राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरल्यानंतर विशेषतः आंबेडकर चळवळीतील जेष्ठशौरेष्ठ धुरिणांनी पोलीस यंञणेला जाब विचारला.त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळू नये म्हणून जनरेट्याचा वाढता दबावा लक्षात घेऊन राञी पावणे बाराच्या दरम्यान दिपक डोके यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली.दिपक डोके च्या फिर्यादीवरून दोन जणांविरूध्द भादवी कलम 323,504,506,34 अनुसुचित जाती जमाती 3 (1)(10). ( अट्रासीटी ऍक्ट )नुसार गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास सहा.पोलीस राजू भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.मारहाण करणारा गट पुर्वाश्रमीचे मनसे आमदार तर सध्या भाजपात सक्रीय असलेल्या बलाढ्य नेत्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.यावरून भाजपाचे पदाधिकारी आजही जातपात आणि गरीब श्रीमंतांचा भेद करून भेदाचे राजकारण करीत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे,मारहाण करणारा गट सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यामुळेच पोलीस गुन्हा दाखल करून धजावत नसल्याची चर्चा आहे.