Breaking News

गुरुग्राममधील हत्येप्रकरणी आवश्यक ती पावले उचलणार - केंद्रीय मंत्री जावडेकर

नवी दिल्ल, दि. 10, सप्टेंबर - गुरूग्राममधील रेयान इंटरनॅशनल शाळेत झालेल्या प्रद्मुनच्या हत्येची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी  पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेतला आहे. त्यामुळे आवश्यक ती पावले उचलली जातील आणि त्याच्या कुटुंबियांना लवकरच न्याय मिळेल, असे आश्‍वासन मनुष्यबळ  विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.
ते म्हणाले की, ही घटना फार दुर्देवी आहे. ही घटना म्हणजे शाळा आणि पालकांसाठी हा सावधगिरीचा इशारा आहे. अशी दुर्घटना पुन्हा होवू नये म्हणून सावधगिरी  बाळगणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे हरियाणाचे शिक्षण मंत्री रामविलास शर्मा यांनी सांगितले. तसेच रेयान  इंटरनॅशनल या शाळेचा परवाना रद्द करण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये दुसरीत शिकणार्‍या सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूरची शुक्रवारी सकाळी गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह शाळेच्या  शौचालयात सापडला होता.