Breaking News

मुंबई बाँबस्फोट; फाशीच योग्य

मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयानं अबु सालेम आणि करिमुल्लाह या दोघांना आजन्म कारावास तसंच प्रत्येकी दोन लाख रुपये दंड, ताहीर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा तर रियाज सिद्दीकीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अबु सालेमला पोर्तुगालमधून आणताना जी अट घालण्यात आली होती, त्या अटीचं पालन करून न्यायालयानं हा निकाल दिला. आजन्म कारावास म्हणजे त्याला मरेपर्यंत तुरुंगवासात राहावं लागणार आहे. न्यायालयानं कायदेशीर तरतुदीचा पुरेपूर आधार घेत 257 जणांचा बळी घेणार्‍यांच्या बाबतीत न्याय केला असं म्हणावं लागेल. न्यायालयानं शिक्षा सुनावल्याचं ऐकताच अबु सालेमनं जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. त्यानं महाराष्ट्राबाहेरील तुरुंगात हलवण्याची मागणी केली आहे.
दोषींमध्ये मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशीद खान, ताहिर मर्चेंट, कलीमुल्लाह खान व रियाज सिद्दीकीचा समावेश आहे. मुस्तफा दोसा हा रायगडमध्ये आरडीएक्स पोहोचवण्यासह आरोपींना पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठवणं आणि कट रचणं या प्रˆकरणात दोषी होता. दोसाला भारतात आरडीएक्स आणण्याच्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आलं होतं; परंतु 28 जूनला त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. सलेम याला गुजरातमधील भरूच येथून मुंबई शस्त्रसाठा पोहोचवल्याप्रˆकरणी दोषी ठरवण्यात आलं. फिरोज अब्दुल रशीद खान यांचा कट रचणं तसंच निष्पाप नागरिकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. ताहिर मर्चेंट यांचा स्फोट घडवून आणल्याचा कटात सहभाग घेतल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. गँगस्टर अबू सालेमला पोर्तुगाल येथे आत्मसमर्पण केल्यानंतर भारतात आणण्यात आलं. पोर्तुगालसोबत असलेल्या करारानुसार न्यायालय सालेमला फाशीची शिक्षा सुनावू शकत नव्हतं. शिक्षेवर युक्तीवाद करताना सरकारी वकिलांनी दोषींना अत्यंत कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यातील दोघांनाच फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर एकाला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईत 12 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता. 700 पेक्षा आधिक लोक गंभीर जखमी झाले होते. पहिल्या टप्पात न्यायालयानं दिलेल्या निर्णयात शंभर लोकांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या बॉम्बस्फोटांमध्ये 27 कोटी रूपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं. या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इबˆाहिम, टाइगर मेमनसह 27 आरोपी फरार आहेत. मुस्तफा दोसा, टायगर मेमन आणि छोटा शकील यांनी पाकिस्तानात दहशतवाद घडवण्यिासंबंधी ट्रेनिंग कॅम्प घेतले होते. सर्व हल्लेेखोरांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं. स्फोटांपूर्वी दुबई आणि इतर ठिकाणी 15 बैठका घेण्यात आल्या होत्या. बाँबस्फोटप्रकरण हे देशद्रोही कृत्य असूनही गेल्या 25 वर्षानंतर त्यांच्या बाबतीत शिक्षा झाली, हा खरेतर मुंबई बाँबस्फोट प्रकरणाातील मृतांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय नाकारण्याच प्रकार आहे. आरोपींनी इतक्या क्लृपत्या वापरून निकाल लवकर कसा लागणार नाही, याची व्यवस्था केली. देशाच्या विरोधात प्रॉक्सी वॉर केलेल्या या आरोपींची खुमखुमी अजूनही जिरलेली नाही. दोषींना शिक्षा सुनावली जात असताना अबु सालेम आणि करिमुल्ला यांच्यात भांडण झालं. त्यांनी कोर्टरुममध्येच एकमेकांकडं खुन्नसनं पाहिले आणि दोघं एकमेकांवर धावूनही गेले होते. त्यामुळं तर अबु सालेमनं आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली असावी. या प्रकरणात संजय दत्तला ही आरोपी करण्यात आलं होतं. त्याच्या घरी शस्त्रास्त्र पाठविण्यात याच आरोपींचा हात होता.
अबु सालेमच्या काळ्या कृत्याचे अनेक किस्से मीडियात पˆसिद्ध आहेत. दाऊद इबˆाहिमच्या सांगण्यावरूनच अबु सालेमनं हे स्फोट घडविले होते. अभिनेत्री मोनिका बेदीसोबतचे त्याचे जवळचे संबंध तर सर्वांनाच माहीत आहेत. तो चोरीच्या लग्जरी कार्स दुबईत विकायचा. अबु भारतात गुन्हेगारी कृत्य करायचा. त्यातून मिळवलेले पैसे दुबईत गुंतवणूक करून बिझनेस करायचा. 1993 च्या हल्ल्यानंतर भारतात अडकण्याचा धोका लक्षात येताच तो काही वर्षे मुंबईतून दुबईला पळून गेला. तिथं त्यानं किंग्स ऑफ कार ट्रेडिंग ही कंपनी सुरू केली होती. ही कंपनी जगभरातील चोरीच्या अनेक लक्झरी कार्स आपल्या खास नेटवर्कद्वारे दुबईत मागवून घ्यायची. तिथं त्या कारचं रिफर्निश केलं जायचं. त्यानंतर पुन्हा चमचमणार्‍या या कार्स अरबमधील श्रीमंत शेख लोकांना विकल्या जायच्या.
अबुनं दुबईत रियल इस्टेट डीलचंही काम केलं. त्यातून तो मोठी कमाई करायचा. त्याच्याजवळ एक मसिर्डीजची एक खास कार होती. याशिवाय तो अनेक स्टेज शोसुद्धा करायचा. तेथूनही डॉनला मोठी रक्कम मिळायची. मोनिका बेदी आणि सालेमचे अनेक वर्षे संबंध राहिले. सालेमला पोर्तुगालमध्ये ताब्यात घेतलं होतं, तेव्हा सालेमसोबत मोनिकासुद्धा आढळली होती.