Breaking News

कोरेगावात डेंग्यूविषयी जनजागृती, सर्व्हेक्षण मोहिम

सातारा, दि. 01, सप्टेंबर - कोरेगाव नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्तपणे 17 प्रभागांमध्ये डेंग्यू सर्व्हेक्षण मोहिम हाती घेण्यात आली होती. प्रत्येक  पथकात 5 कर्मचार्‍यांसमवेत नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये घरोघरी जाऊन ताप रुग्ण सर्व्हेक्षण , डास अळी सर्व्हेक्षण करण्यात आले.या मोहिमेमध्ये  माहितीपत्रके आरोग्य विषयीची माहिती देण्यात आली. डास,अळया आढळलेल्या ठिकाणी डास, अळी नाशकाचा वापर करुन नाश करण्यात आल्या. तसेच घरातील  सर्व पाणी साठवण्याची भांडी आठवडयातून एकदा धुवून स्वच्छ करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच 4 फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी करण्यात आली. या  मोहिमेमध्ये 2252 घरांची तपासणी केली असून डास अळी आढळलेले कंटेनर 364, डास अळी नाशक अळी टाकलेले कंटेनर 200, रिकामे केलेले कंटेनर 164,  किरकोळ ताप रुग्ण 27 आढळले आहेत. या मोहिमेमध्ये कोरेगावचे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे तसेच नगरसेवक , मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी,  आरोग्य विभागाचे व नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.