Breaking News

धरणगाव येथील जलशुध्दीकरण केंद्राचे काम तातडीने सुरु करण्याचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगाव, दि. 14, सप्टेंबर - तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या धरणगाव येथील जलशुध्दीकरण केंद्राचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील यांनी दिले.याबाबतची आढावा बैठक सहकार राज्यमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर  करुन तात्काळ जल शुध्दीकरण केंद्राचे बांधकाम सुरु करा. तसेच धरणगाव शहरात नव्याने एक जलकुंभ, मुख्य पाइपलाइन व शहरातील 60 मि.मि. ची पाणीपुरवठा  वितरण व्यवसथेचा 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकड़े त्वरित सादर करण्याचे निर्देशही संबंधित अधिकार्‍यांना दिले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानातंर्गत धरणगाव वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी (जलशुध्दीकरण केंद्र व उर्वरित कामे) सहकार राज्यमंत्र्यांच्या  प्रयत्नाने चार कोटी 28 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलशुध्दीकरण केंद्राच्या जगेच्या तांत्रिक अडचणी मुळे कामास अडथळा निर्माण झाला होता यासाठी  राज्यमंत्री श्री. पाटील यानी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करुन गांधी उद्यानामधील जागा वापरास परवानगी मिळवली आहे. यामुळे जून 2018 पर्यंत धरणगाव  वासियांना शुद्ध पाणीपुरवठा मिळणार आहे.
या बैठकीस नगरपालिकेतील शिवसेना गटनेते विनय भावे, मुख्याधिकारी श्रीमती एस ड़ी वसावे, मजिप्रा चे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, कंत्राटदार ए. पी.  सास्ते यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.