‘सीबीआय’ चौकशीसाठी प्रद्युम्नचे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार
नवी दिल्ली, दि. 12, सप्टेंबर - प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी त्याचे कुटुंब आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. 8 सप्टेंबर रोजी प्रद्युम्नचा मृतदेह शाळेच्या शौचालयात सापडला होता. यानंतर या प्रकरणी शाळेच्या बस वाहकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी शालेय प्रशासनाक़डून योग्य माहिती दिली जात नाही त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, असे प्रद्युम्नच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
या हत्येप्रकरणी पोलिसांकडून योग्यप्रकारे चौकशी केली जात नाही. प्रद्युम्नच्या खर्या मारेकर्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असेही प्रद्युमनचे वडिल म्हणाले.
या हत्येप्रकरणी पोलिसांकडून योग्यप्रकारे चौकशी केली जात नाही. प्रद्युम्नच्या खर्या मारेकर्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असेही प्रद्युमनचे वडिल म्हणाले.