Breaking News

घोटी येथे खत व बियाण विक्री दुकानात दारू विक्री

नाशिक, दि. 26, ऑगस्ट - घोटी येथील खत व बियाण विक्री दुकानात दारू विरू असल्याच्या प्रकराची जिल्हा परिषद सभापती तथा उपाध्यक्षा नयना गावित यांनी  गंभीर दखल घेत, या प्रकरणी जिल्हा कृषी अधिकार्‍यांची कानउघडणी केल्याचे समजते. अधिकार्‍यांना पाठींशी घातल्यास कारवाईचा इशारा गावित यांनी दिला असून  असे प्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाची तातडीने बैठक घेण्याचे आदेशही दिले आहेत.
घोटीच्या विक्रेत्यास खत व ओषधे विक्री परवाना दिलेल्या दुकानात दारू विक्री सुरू होती. यावर, तातडीने जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे यांनी चौकशी करून  अहवाल सादर करण्याचे आदेश परवाना देणार्‍या तालुका कृषी अधिकार्‍यांना दिले होते.अहवाल प्राप्त प्राप्तीनंतर दारू दुकान सुरू असल्याचे समोर आले, त्यावर काळे  यांनी संबंधित विक्रेत्यांचा तीन महिन्यांसाठी परवाना निलंबीत करण्याची कारवाई केली. तसेच सबंधित तालुका कृषी अधिकारी यांचा पदभार काढण्याचा प्रस्ताव ही  ठेवण्यात आला. मात्र, यावर उपाध्यक्षा तथा कृषी सभापती नयना गावित यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. प्रत्यक्षात काल उपाध्यक्षा गावित यांनी सदर  प्रकरणी जिल्हा कृषी अधिकारी यांची चांगलीच कानउघडणी केली. खत परवान्यांची तपासणी झालेली असताना असे प्रकार कसे झाले, यामागे नेमके कोणते  अधिकारी आहे, तसेच यात नेमकी काय कारवाई झाली अशी विचारणा ही त्यांनी केल्याचे कळते.
या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, यात अधिकार्‍यांना पाठींशी घातल्यास तुमच्यावरही कारवाईचा बडगा उाईल च्या  शब्दात जिल्हा कृषी अधिकार्‍यांस उपाध्यक्ष गावित यांनी सुनावले.