Breaking News

गणेश उत्सवासाठी आकर्षक कापडी फुलांचे इको फ्रेंडली मकर

अहमदनगर, दि. 24, ऑगस्ट - गणपती उत्सवात घराघरात सजावटीची तयारी सुरु झाली आहे. पर्यावरणपुरक सजावटीचे महत्व ओळखुन इको फ्रेंडली  सजावटीकडे कल वाध्त असुन हीच गरज लक्षात घेऊन सावेडीतील माय सिनेमा समोरील तुळजाई फ्लोरिस्ट अ‍ॅण्ड डेकोरेटर्सने रंगीत, चमकदार, कापड, लाकुड,  बांबु, कापडी फुले वापरुन तयार केलेल्या आकर्षक मकरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. फुलांचा पारंपारिक व्यवसाय करणा-या गारुडकर कुटुंबियांनी 5  वर्षापासुन आकर्षक इको फ्रेंडली मखरी नगरकरांसाठी खास उपलब्ध करुन दिलेले असुन त्यास दरवर्षी मागणी वाध्तच आहे.
बदलत्या काळात व्यवसायात नाविन्यता गरजेची आहे हे ओळखुन सागर गारुडकर या युवकाने पुण्यात प्रशिक्षण घेऊन कापडी फुलांचा व्यवसाय सुरु केला. त्यातूनच  मग गणेश उत्सवात थर्माकॉलचा वापर कमी व्हावा, कमी खर्चात आकर्षक सजावट व्हावी या उद्देशाने कापडी फुलांचे पर्यावरणपुरकर मखर तयार केले. लोकांना  नाविन्यपुर्ण सजावट मिळावी या दृष्टीने व विजेची बचत व्हावी या हेतुने या वर्षी लोकांच्या मागणीनुसार एल.ए.डी. लाईटचा वापर करुन मखर बनविण्याचा मानस  ठेवला आहे. गणेश उत्सवात पर्यावरणाचे महत्व वाधवे या हेतुने अंदाजे 300 ते 5000 रुपयांचे मखर येथे उपलब्ध असुन हे पुन्हा वापरता येतात.
या वर्षी आकर्षक कमान, डंबरु सेटअप, मोदक, झोपाळा, डोम या विविध प्रकारचे आरटीफिशियल साहित्य सुंदर रंगेबीरंगी फुलांसह उपलब्ध आहे. यांच्या  खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.