Breaking News

देशातील पहिल क्षेत्रीय विदेश भवन महाराष्ट्रात

परराष्ट्रासंबंधीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 28, ऑगस्ट - मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रदेश मे विदेश या संकल्पनेतून असे विदेश भवन सर्वप्रथम महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी श्रीमती  स्वराज यांचे विशेष आभार मानत मुख्यमंत्री म्हणाले, परराष्ट्रासंबंधीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणार्‍या देशातील पहिले विदेश भवन मुंबईत  उभारण्यात आले आहे.कुठल्याही प्रकल्पाची सुरुवात मुंबईतून केली तर ती नक्कीच यशस्वी ठरते. या विदेश भवनाचा राज्यातील जनतेला सर्वाधिक फायदा होणार  असून, देशातील पहिल क्षेत्रीय विदेश भवन जगभरात देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम करेल. केंद्र शासन कसे सहयोगी आहे, हे जग पाहिल. शक्तिशाली राष्ट्र म्हणून  देशाची जशी ओळख आहे, तशीच जबाबदार राष्ट्र म्हणूनही यामुळे ओळख निर्माण होईल.राज्याने पासपोर्टसाठी केली जाणारी पोलीस पडताळणीची सुविधा ऑनलाइन  उपलब्ध करून दिल्यामुळे 24-48 तासांमध्ये पासपोर्ट मिळत आहेत. राज्यातील सर्व पोलीस ठाणी डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्यात आली असल्याचेही  मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  
परराष्ट्र राज्यमंत्री श्री. सिंह म्हणाले की, देशातील पहिले विदेश भवन महाराष्ट्रात उभारण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. मिनीमम गव्हर्नमेंट,  मॅक्झिमम गव्हर्नंन्स या तत्त्वावर केंद्र शासन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. परराष्ट्रासंबंधीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने शिक्षण व  नोकरीसाठी विदेशी जाणार्‍या तरुणांना यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.
दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ, सीसीआय (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) व नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटरद्वारे ई-सनद सेवा उपलब्ध करून दिली  आहे. या सेवेचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. पासपोर्टच्या दृष्टीने ही सेवा महत्वाची आहे. यामुळे कागदपत्रांची पडताळणी व ती स्वाक्षांकित करण्याची  प्रक्रियादेखील ऑनलाइन झाली आहे. यासाठी ुुु.शीरपरव.पळल.ळप हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.