महिला सशक्तीकरणाला बळ मिळेल - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, दि. 23, ऑगस्ट - तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ’ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना अन्य धर्मीयांतील महिलांसारखेच हक्क मिळतील . त्यामुळेच हा निर्णय ऐतिहासिक आहे , असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे . भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी या निर्णयाचे स्वागत करून म्हटले आहे की , या निर्णयाने कोणाचा विजयही झालेला नाही अथवा कोणाचा पराभवही झालेला नाही. मुस्लिम महिलांना त्यांचे मूलभूत अधिकार प्रदान करणारा हा निकाल आहे. या निर्णयामुळे मुस्लीम महिलांच्या समानतेचे नवे युग सुरु होईल. भाजपच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की ,बहुतांश मुस्लीम देशांमध्ये तोंडी तलाकची प्रथा अस्तित्वात नाही . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुस्लीम महिलांच्या आयुष्यात स्वाभिमानाचे नवे युग सुरु होणार आहे.
मुस्लीम महिलांची बाजू सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडल्याबद्दल शाह यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले . भाजपच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी म्हटले आहे की तिहेरी तलाक हा कुराण आणि घटनाविरोधीही आहे. ’शाह बानो ते सायरा बानो ’ असे वर्तुळ आज पूर्ण झाले आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी - घटनेतील समानतेचे तत्व मुस्लीम महिलांना नाकारले जात होते . न्यायालयाच्या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना समान न्याय मिळू शकेल. अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाचे वकील झफरयाब जिलानी यांनी सांगितले की , आमची कायदा विभागाची समिती या निकालाचा अभ्यास करेल आणि त्या नुसार मंडळाला सल्ला दिला जाईल.