Breaking News

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत  अव्वल स्थानावर असलेल्या कोरियाच्या सोन वान हो याने श्रीकांतचा 21-14, 21-18 असा पराभव केला. श्रीकांतच्या पराभवसह स्पर्धेच्या पुरूष एकेरीत भारताचे  आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, महिला एकेरीत सिंधू आणि सायनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.