Breaking News

मालवणच्या पारंपरिक मच्छीमारांचा समुद्रात संघर्षाचा निर्णय

रत्नागिरी, दि. 16, ऑगस्ट - पर्ससीन नौकांच्या बेकायदा मच्छीमारीच्या विरोधात भर समुद्रात जाऊन थेट संघर्ष करण्याचा निर्णय मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे  पारंपरिक मच्छीमारांच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 
 किनारपट्टीवर 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदी कालावधी असतो. त्यानुसार 1 ऑगस्टपासून नवा मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. कोकणात अन्य  मासेमारीचा हंगाम सुरू  तरी पर्ससीन मासेमारीकरिता 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट हा बंदी कालावधी आहे. तरीही सिंधुदुर्गातील मिनी पर्ससीन नौकाधारक  अनधिकृतरीत्या मासेमारी करीत आहेत. मासेमारी हंगामास सुरवात  मिनी तसेच परराज्यातील पर्ससीनधारकांनी जिल्ह्याच्या समुद्रात घुसखोरी करून  मासळीची लूट करण्यास सुरवात केली. गेले काही दिवस समुद्रात कोळंबी मुबलक प्रमाणात मिळू लागल्याने मिनी पर्ससीनधारकांनी  येऊन कोळंबीची लूट करण्यास  सुरवात केली होती. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार संतप्त बनले होते. पारंपरिक मच्छीमारांच्या संघर्षाच्या इशार्‍यानंतर गेले दोन दिवस मिनी पर्ससीन मासेमारी थांबली  होती.  पारंपरिक मच्छीमारांच्या जाळीत कोळंबी आणि अन्य मासळी मिळाली. मात्र काल सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या हद्दीत गोवा राज्यातील शेकडो पर्ससीन  नौकांनी घुसखोरी केली. गोवा व अन्य  सर्व प्रकारच्या मासेमारी नौकांना महाराष्ट्र सागरी हद्दीत बारा नॉटिकल मैलांपर्यंत मासेमारी बंदी क्षेत्र आहे. तरीही पर्ससीन  नौका घुसखोरी करत असल्याने पारंपरिक मच्छीमार संतप्त झाले. आज जिल्ह्यातील  मच्छीमारांची बैठक मालवणमध्ये झाली. बैठकीला मच्छीमार संस्थांचे  प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पारंपरिक मच्छीमारांबाबत उलट सुलट वक्तव्ये करणार्‍या भाजप  प्रमोद जठार आणि प्रदेश  चिटणीस राजन तेली यांच्यावर तोफ डागण्यात आली. पारंपरिक मच्छीमारांसाठी आंदोलन करणार्‍या आमदार नीतेश राणे यांचे अभिनंदन करण्यात आले.
बैठकीला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक  यांनी मच्छीमारांना पाठिंबा दिला. पारंपरिक मच्छीमार नसला तर जिल्ह्यातील बाजारपेठा ओस पडतील. आपण  व्यवसायात, राजकारणात यशस्वी झालो तो पारंपरिक मच्छीमारांमुळेच. त्यामुळे  मच्छीमारांना पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. पारंपरिक मच्छीमारांना नेहमीच  संघर्ष करावा लागतो. न्यायालयात जाऊन, चर्चा करून प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे यापुढे कुठेही समुद्रात पर्ससीन नौका दिसली, तर थेट  जाऊत संघर्ष  करून तिला बोटीला किनार्‍यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी रविकिरण तोरसकर, दिलीप घारे, रमेश धुरी, गंगाराम आडकर, धर्माजी  आकांक्षा कांदळगावकर, अन्वय प्रभू, बाबा मोंडकर, विनोद सांडव, अमित  इब्राहिमपूरकर इत्यादी उपस्थित होते. दरम्यान, पर्ससीन नौका हटाव लढा पुकारल्यानंतर पारंपरिक मच्छीमारांना आजचा दिवस चांगला गेला. मालवण किनार्‍यावर  एका मच्छीमाराच्या  सुमारे दोन टन कोळंबी मिळाली.