Breaking News

न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो - खा . ओवैसी

हैदराबाद, दि. 23, ऑगस्ट - तोंडी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आपण आदर करतो , अशी प्रतिक्रिया ’एमआयएम’ चे खा.  असादुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली आहे . खा . ओवैसी यांनी सांगितले की , न्यायालयाने हा निर्णय एकमताने दिलेला नाही हे विसरता येणार नाही .  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रत्यक्षात आणणे हे अत्यंत अवघड आहे. कारण न्यायालयाच्या म्हणण्यानुसार या संदर्भात कायदा करायचा झाला तर त्या  संदर्भात किती व्यावहारिक अडचणी आहेत हे लक्षात येईल .
काँग्रेस नेही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तिहेरी तलाक पद्धतीमुळ मुस्लीम महिलांवर होणारा अन्याय या निकालामुळे दूर होण्यास  मदत मिळेल , असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता संसद पुरोगामी आणि  सर्वसमावेशक कायदा तयार करेल , अशी प्रतिक्रिया राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी व्यक्त केली आहे.  काँग्रेस चे नेते  स्लामनं खुर्शीद यांनी सांगितले की , न्यायालयाचा आजचा निर्णय इस्लामच्या तत्वांशी सुसंगत आहे. जे घडावे असे वाटत होते तेच घडले आहे .  उत्तर  प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयाचे स्वागत करीत या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.