आज आम्ही लढाई जिंकलो, शायरा बानो यांच्याकडून समाधान व्यक्त
नवी दिल्ली, दि. 23, ऑगस्ट - तोंडी तलाक प्रथा बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या शायरा बानो यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले आहे. तोंडी तलाकमुळे माझ्या वाट्याला आलेला त्रास मी सहन केला. मात्र, त्याने खचून न जाता आपल्यासारख्या अन्य महिलांसाठी लढायचे ठरवले. केवळ अशिक्षितच नाहीत तर सुशिक्षित महिलाही या त्रासातून जात आहेत. आज आम्ही आमची लढाई जिंकलो आहोत, असे त्या म्हणाल्या.
हा निर्णय कळला तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. मुस्लिम महिलांसाठी हा निर्णय ऐतिहासिक आहे. आनंद साजरा करण्याचा आमचा आजचा दिवस आहे, असे त्या म्हणाल्या. आपल्या तलाकबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, 2002 साली माझा अलाहाबादमधील रिझवानशी निकाह झाला. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांकडून हुंड्याची मागणी होऊ लागली. मला सारखी तलाकची धमकी दिली जायची. मारहाण केली जायची. त्यामुळे मी वरचेवर आजारी असे. त्यावेळी नातेवाईकांकडून पतीला तलाकचे सल्ले दिले जात. त्यानंतर माहेरी उपचारासाठी आले असता पतीने पत्र पाठवून तलाक दिला, असे त्यांनी सांगितले. माझा भाऊ व त्याचे कुटुंब माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुऴेच मी हा लढा लढू शकले, असेही त्यांनी सांगितले.