Breaking News

खेलरत्न पुरस्काराचे 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

नवी दिल्ल, दि. 23, ऑगस्ट - भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंगला 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ  कोविंद यांच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. क्रिकेटपटू चेतेश्‍वर पुजारा आणि महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत  कौर,गोल्फपटू एस.एस.पी. चौरसिया, टेनिसपटू साकेत मैनेने यांच्यासह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच सात प्रशिक्षकांना  द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. तर, तीन खेळाडूंना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.