ऐन सणासुदीत राज्यातील 49 हजार रेशन दुकानं बंद
रत्नागिरी, दि. 16, ऑगस्ट - सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यातील 49 हजार रेशन दुकानं गेल्या 14 दिवसांपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून बंद आहेत. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातच हून अधिक रेशन दुकानं बंद आहेत. वितरण यंत्रणेच्या वादामुळे अनेक कुटुंबांमध्ये रेशन पोहोचूच शकलेलं नाही.
मात्र धान्य दुकानांपर्यंत पोहोचवलं जात असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय, तर दुसरीकडे धान्य दुकानदारांनाच गोदामातून आणावं लागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वितरण यंत्रणा उभारण्यात सरकारला अपयश येत असल्याचा आरोपही दुकानदारांकडून करण्यात आहे. त्यामुळे एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात अकरा लाखांहून अधिक घरं रेशनपासून वंचित राहिली आहेत. वितरण यंत्रणेच्या वादावरून मात्र ग्राहकांचे नाहक हाल होत आहेत.