मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी - पंढरपुरच्या दारी’
मुंबई, दि. 02 - ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर मार्गावरील पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती दिंडीचे आयोजन पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या पर्यावरण दिंडीचा समारोप सोहळा सोमवार दिनांक 3 जुलै 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी जून महिन्यात वारीत राज्यातील दहा लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी होतात. सातशे वर्षांची परंपरा असलेली ही वारकरी संप्रदायाची वारी दिवसेंदिवस लोकाभिमुख चळवळ म्हणून वृद्धींगत होत आहे. वर्तमानातील समाज जीवनात पर्यावरणाचे प्रश्न हे शहरी व ग्रामीण भागांना समानधर्मी अर्थाने भेडसावत आहे. वारीतील भक्तांची पर्यावरण विषयक जागृती करावी म्हणून गेल्या चार वर्षापासून पर्यावरण विभागाने ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
या जनजागृतीपर दिंडीत कीर्तन, प्रवचन, भारूड, पोवाडा, गणगवळण, बतावणी अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात असते. या उपक्रमात विजेची बचत, पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन, प्लास्टिकचा वापर टाळा, वृक्षतोड टाळा, सेंद्रिय खतातून शेती करा, घरातील प्रत्येक माणसाने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी असे विविध संदेश देण्यात येतात. या वारीत दोनशे वारकरी सहभागी झाले असून, शाहीर देवानंद माळी, भारूडरत्न चंदाबाई तिवाडी, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे आदी लोककलावंतांच्या माध्यमातून ही वारी पर्यावरण विषयक जनजागृतीचा संदेश देते.