15 ऑक्टोबरपर्यंत ताडोबा अभयारण्य बंद
चंद्रपूर, दि. 02 - चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून 15 ऑक्टोबर 2017 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय अचानक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी ताडोबा प्रशासनाने वन्यजीव प्रेमींची मागणी आणि एनटीसीएच्या गाईडलाईन्स नुसार ताडोबा प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवावा असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. ताडोबाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पर्यटकांसाठी पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ऑनलाईन बुकिंग झालेल्या पर्यटकांची रक्कम परत केली जाणार आहे.
