Breaking News

अपंगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

नाशिक, दि. 29 - अपंग कल्याण, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह या संस्थेअंतर्गत सर्टिफिकेट इन कॉम्पुटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस व  मोटार ण्ड रिवायडींग सब मर्सिबल पंप सिंगल फेज, एम.एस.सी.आय.टी. (संगणक कोर्स )या एक वर्षीय प्रशिक्षणासाठी सन 2017-18 साठी मोफत प्रवेश देणे सुरू  आहे. प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता अनुक्रमे किमान 8 वी व 9वी पास असून वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष अशी आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 31 जुलै  2017 पर्यंत अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह,टाकळी रोड,म्हेत्रे मळा गोदड मळ्याजवळ,मिरज जि.सांगली पिनकोड 416410 नंबर  0233-2222908 व मोबाईल क्रमांक 9922577561, 9975375557 वर संपर्क करावा.प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्याचे सक्षम  अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात.