Breaking News

पंजाबमध्ये उत्पादन शुल्क कायद्यात दुरुस्ती; महामार्गांलगत दारू विक्रीस परवानगी

चंदीगढ, दि. 24 - महामार्गांलगत दारू विक्री करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देत पंजाब सरकारने आज उत्पादन शुल्क कायद्यात दुरुस्ती केली. यानुसार आता महामार्गांलगत हॉटेल, रेस्टॉरंट व क्लबमध्ये दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आधी सोमवारी उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम 26 अ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.
राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने 1 एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्च रोजी दिले होते. या आदेशामुळे 500 मीटरच्या टप्प्यात सुमारे 1 हजार मंगल कार्यालये येत होती. त्यामुळे मंगल कार्यालये अडचणीत येत होती.