Breaking News

शेतकरी संपावर : शेतकर्‍यांचा संप चौैथ्या दिवशीही सुरुच

मुंबई, दि. 04 - आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेली  आश्‍वासनं आपल्याला मान्य नसून आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी म्हटलं आहे. शेतकरी संप अजूनही सुरु  ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी केला असला तरी आता राज्यातल्या बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक सुरु झाली आहे. आज सकाळी नाशिक बाजारात 195 ट्रक  भाजीपाला पोलिस बंदोबस्तात बाजार समितीत आणण्यात आला, तर शहराची गरज लक्षात घेता 95 टँकर दूधही बाजारात आणण्यात आलं.
भाजीपाला, दुधाच्या गाड्या अडवून त्यांची नासाडी करणार्‍या तब्बल 150 शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्यांची धरपकड सुरु आहे.  परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री गिरिष महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.
नंदुरबार : शेतकरी संप : शहादा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करुन या सरकारचा निषेध केला
इंदापूर : चौथ्या दिवशी शेतकर्‍यांचा संप सुरु, आजचा रविवारचा शहरातील आठवडे बाजार बंद. शेतकर्‍यांनी रस्त्यावर दुध व पालेभाजी फेकून सरकारचा निषेध  केला. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना संपातून बाहेर, प्रदेशाध्यक्ष अनिल अवघट यांची घोषणा, गरज पडल्यास पुन्हा संप करण्याचे संकेत
सोलापूर : जनहित शेतकरी संघटना आक्रमक, मोहोळचा आठवडी बाजार उधळून लावला.  शेतकरी आणि व्यापार्‍यांना संपात सहभागी होण्याचं आवाहन. भरलेला  बाजार केला रिकामा. शेतकरीसंपावर जालना-सिंदखेड राजा रस्त्यावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको, दोन तासांपासून वाहतूक ठप्प, गवळी पोखरी फाट्यावर शेतकर्‍यांनी  रस्ता अडवला शेतकरीसंपावर औरंगाबाद पाचोड आठवडी बाजार बंद, तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद अहमदनगरला कर्जत तालुक्यात शेतकरी संघटना संपावर  ठाम आहेत. जयाजी सुर्यवंशी आणि सदाभाऊ यांचा पुतळा शेतकर्‍यांनी जाळला. शेतमाल मार्केटला न पाठवण्याचा निर्धार करत दुधाचा टॅकर सोडून दिला आहे.