नवी मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
16 वर्षांच्या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. तर 19 वर्षीय मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला होता. याशिवाय 25 वर्षीय मुलगी विधवा आहे. धक्कादायक बाब म्हणजे दहावीची परीक्षा दिलेल्या 16 वर्षांच्या मुलीला तिच्या आईनेच या सेक्स रॅकेटमध्ये ढकललं. तर आपण एका बॉलिवूड दिग्दर्शकाची मुलगी असल्याचं 19 वर्षीय मुलीने सांगितलं.
पोलिसांनी या प्रकरणात शकीला शेख, पुष्पलता आणि मार्गेटला या तिघींनी अटक केली आहे. या तिघींनी वाशीमध्ये घर भाड्याने घेतलं होते. तिथूनच ह्या शरीरविक्रीचा धंदा करत होत्या. या तिघी दलालांच्या माध्यमातून ग्राहकांना शोधत असत. पोलिसांना काही दिवसांपूर्वीच या सेक्स रॅकेटची कुणकुण लागली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केलं.