संपात खरे शेतकरी नसून गुन्हेगार सहभागी - गिरीश महाजन
नाशिक, दि. 04 - मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरच शेतकर्यांनी एकमुखाने आपला संप मागे घेतला. मात्र तरीही नाशिकमध्ये काही संघटनांनी संप सुरू ठेवला. या संपात खरे शेतकरी सहभागी नसून शेतकर्यांच्या नावाखाली काही सराईत गुन्हेगार सहभागी असल्याचा आरोप करत हा संप म्हणजे काही राजकीय पक्षांच्या आंदोलनाची लढाई असल्याचे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
नाशिकच्या संघटनांनी संप सुरूच ठेवल्याच्या निर्णयानंतर गिरीश महाजन तातडीने जळगावहून नाशिकला दाखल झाले.शेतकर्यांच्या 70 टक्के मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून पुणतांब्याच्या अधिकृत संपकरी शेतकर्यांशी मुख्यमंत्री बोलले आहे. मात्र तरीही शेतकर्यांच्या मागर्या असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असेही सांगत त्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे संप मागे घेणार नसल्याचे किसान क्रांती संघटनेने कळविले आहे. त्यामुळे संपाबाबत शेतकर्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे.दरम्यान आज सायंकाळी येथील मार्केड यार्डमध्ये कुठलाही भाजीपाल्याची आवक झाली नसल्याचे समजते.