इराणच्या संसदेवर हल्ला, एका जवानाचा मृत्यू
तेहरान, दि. 07 - इराणच्या संसदेवर तीन हल्लेखोरांकडून केलेल्या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर, आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांनी काही लोकांना ओलीस ठेवल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तेहरानच्या दक्षिणेकडील भागात गोळीबार होत झाल्याचेही वृत्त आहे.
हल्लेखोरांकडे एके-47 रायफल होती. ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय दक्षिण तेहराणमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट झाल्याचेही वृत्त आहे.
हल्लेखोरांकडे एके-47 रायफल होती. ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय दक्षिण तेहराणमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट झाल्याचेही वृत्त आहे.