माछिल सेक्टरमध्ये पाककडून घुसखोरीचा प्रयत्न, 4 दहशतवाद्यांना कंठस्नान
नवी दिल्ली, दि. 08 - जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणार्या 4 दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं कंठस्नान घातलं आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये रात्री उशीरा सीमा रेषेवर 4 दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं सैन्याला निदर्शनास आलं. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, असता घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
यानंतर दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक झाली आणि या चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दुसरीकडे भारत-पाक सीमेवरील कुंपण कापल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे किती दहशतवाद्यांनी घुसखोरी केली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दरम्यान, गेल्या 15 दिवसांत सीमा रेषेवर तिसर्यांदा घुसखोरीचा डाव उधळून लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास पाकने अटकाव घालावा, यासाठी भारताच्या डीजीएओंनी सोमवारी पाकिस्तानला चांगलंच खडसावलं आहे. पण तरीही पाकिस्तानाकडून घोसखोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत.