सोनं आणि हिर्यावर 3 टक्के जीएसटी, 1 जुलैपासून जीएसटी लागू
नवी दिल्ली, दि. 04 - जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्यावर किती टक्के कर लागणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर जीएसटी समितीनं सोन्यावर 3 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच हिर्यांच्या दागिन्यावरही 3 टक्के जीएसटी लावण्यात येईल.
कररचनेसाठी 5, 12, 18 आणि 28 टक्के असा स्लॅब निश्चित करण्यात आला होता. मात्र, सोन्यासाठी 3 टक्क्याचा नवीन स्लॅब तयार करण्यात आला आहे. आज चपला, विडी, रेडिमेड गारमेंट्स इत्यादी वस्तूंसाठीही जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. 500 रुपये किंमतीखालील चपलांसाठी 5 टक्के तर त्यापेक्षा महाग चप्पलांसाठी 18 टक्के जीएसटी लावण्यात येईल. तर बीडीवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. सर्व राज्यांनी मंजुरी दिल्यामुळं 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्याचं जेटलींनी सांगितलं आहे.