Breaking News

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर ’जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स

कोल्हापूर, दि. 24 - कर्नाटक सरकार आणि कानडी भाषेविरोधात बोलणार्‍या बेळगावसह सीमाभागातील महापालिका, नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले  जाईल, असं म्हणणार्‍या कर्नाटकच्या नगर विकासमंत्री रोशन बेग यांना शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आज कोल्हापूरातील मध्यवर्ती बस स्थानकात येणार्‍या  कर्नाटक राज्याच्या बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून त्या बस कर्नाटकात परत पाठवल्या आहेत. जय महाराष्ट्रचे स्टिकर कर्नाटक परिवहनच्या बसवर लावल्यानं  पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.
कर्नाटक व सीमाभागात जय महाराष्ट्र’ बोलण्यास बंदी घालण्याचं वक्तव्य काल सोमवारी बेग यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज  कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं. कर्नाटक सरकारने सीमाभागातील लोकांवर अत्याचार केले आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकारने यात तोडगा काढायला हवा होता.  मात्र, यावर कोणतीही भूमिका घेतली जात नाही. त्यामुळेच वारंवार असे हुकूमशाही पध्दतीचे फतवे काढण्याचे काम कर्नाटक सरकारकडून केले जात आहे. असं  आंदोलक शिवसैनिकांनी म्हटलं आहे.