पंजाबच्या कोलकात्यावरच्या विजयानं प्ले ऑफच्या शर्यतीत चुरशीचा नवा रंग
दरम्यान, मोहालीतल्या सामन्यात ख्रिस लिनचा अपवाद वगळता कोलकात्याच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. पंजाबनं दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा कोलकात्याचा प्रयत्न 14 धावांनी अयशस्वी ठरला आहे. पंजाबचा लेग स्पिनर राहुल तेवातियानं 18 धावांत दोन, तर मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मानं 24 धावांत दोन विकेट्स काढून कोलकात्याला 20 षटकांत सहा बाद 153 धावांत रोखलं. त्यापैकी 84 धावा या एकट्या ख्रिस लिनच्या आहेत.
त्याआधी, रिद्धिमान साहा आणि ग्लेन मॅक्सवेलनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 71 धावांच्या भागिदारीच्या जोरावर पंजाबनं 20 षटकांत सहा बाद 167 धावांची मजल मारली होती. साहानं 33 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलनं 25 चेंडूंतच एक चौकार आणि चार षटकारांसह 44 धावांची खेळी उभारली.
