Breaking News

’आयएसआय ’कडून हिंसाचार घडवण्यासाठी फुटीरतावादी नेत्यांना अर्थसाह्य ?

नवी दिल्ली, दि. 06 - आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर संघटना फुटीरतावादी नेत्यांना पैसे पुरवून काश्मीर खो-यात हिंसाचाराच्या घटना घडवून आणत असल्याचे पुरावे मिळाले असल्याचा दावा एका खासगी वृत्तवाहिनीने केला आहे . पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा प्रमुख अहमद सागर याने फुटीरतावादी नेता शब्बीर शहा याला 70 लाख रूपये देऊन काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणला , असा आरोप या वृत्तवाहिनीने केला आहे . काश्मीर खो-यात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी आयएसआय हुर्रियत नेत्यांनाही पैसे पुरवत असल्याचे सांगण्यात येत आहे. शोपिया, बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पुलवामा या सारख्या जिल्ह्यात हिंसाचार घडवून आणण्यासाठी शब्बीर शहाला पैसे देण्यात आले.
अलीकडेच अटक करण्यात आलेल्या दोन पाकिस्तानी गुप्तहेरांनी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याशी संबंध असल्याचे मान्य केले होते.