Breaking News

ठाण्यातील ‘ओरिजीन इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

ठाणे, दि. 29 - भारत-यूएई व्यापार आणि सामाजिक शिखर परिषदेत आशिया आणि जीसीसी पुरस्कार सोहळ्यात ठाण्यातील ओरिजिन इंटरनॅशनल फर्टिलिटी  सेंटरला 2016-17 सालचा जगातील सर्वात मोठे ब्रॅन्डस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आरोग्यसेवा क्षेत्रातील वंध्यत्व आणि सामाजिक योगदान या विषयात  प्रामुख्याने मिळवलेल्या यशाबद्दल पुरस्कार प्राप्त झाला. हा कार्यक्रम नुकताच दुबईतील द मेडेन हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता.
आशिया मॅगझीन आणि युनायटेड वर्ल्ड ग्रुप होल्डिंग्स द्वारे जगातील सर्वात मोठ्या ब्रँड विजेत्यांची निवड युनायटेड रिसर्च सर्व्हिसेसच्या आशिया आणि गल्फ  कोऑपरेशन कौन्सिल देशांतील 15 उद्योगांच्या संशोधनावर आधारित केली जाते.
ओरिजिन फाउंडेशनचे मुख्य विश्‍वस्त आणि अध्यक्ष इनफर्टिलिटी स्पेशॅलिस्ट डॉ. संदीप माने यानी हा पुरस्कार स्विकारला. ‘व्हिजन 2030’ अंतर्गत परवडण्याजोगी  आरोग्यसेवा जगभरात उपलब्ध होणे शक्य आहे का? या विषयावरील एका महत्त्वाच्या चर्चासत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले होते त्या चर्चेतही डॉ. माने  सहभागी झाले होते. या विषयावर बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले की त्यांनी जवळजवळ 12 वर्षे इंग्लंडमधील आरोग्यसेवा व्यवस्थेत काम केले आहे आणि राष्ट्रीय  आरोग्य सेवेचे स्वरूप फार जवळून पाहिले आहे. तेथे आरोग्य सेवा सर्वांसाठी मोफत आहे, परंतु प्रचंड बॅकलाग आणि अल्ट्रासाउंड स्कॅन सारख्या साध्या चाचण्यांमध्ये  सुमारे 3 महिन्यांची प्रतीक्षा यादी होती. आदर्श जगात, आरोग्यसेवा परवडण्याजोगी आणि त्याच वेळी सर्वांसाठी उपलब्ध झाली पाहिजे. ओरिजिन फाउंडेशन या  विषयावर काम करत आहे आणि जगभरात परवडण्याजोग्या आरोग्यसेवांचे एक मॉडेल तयार करण्याची आकांक्षा बाळगून आहे.