Breaking News

पंतप्रधान मोदी यांनी लाहोर दौरा केल्यास काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघेल - महबूबा मुफ्ती

जम्मू, दि. 06 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोर ल्यास काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघू शकतो, असे मत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. पंतप्रधान मोदीच काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढू शकतील. आधीच्या पंतप्रधानांना पाकिस्तानात जायचे होते. मात्र, त्यांनी हिंमत केली नाही. मोदी लाहोरला गेले. हे शक्तीचे लक्षण असल्याचे मुफ्ती म्हणाल्या. काश्मीर खो-यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मुफ्ती यांनी वक्तव्य केले.
दिवसेंदिवस काश्मीर खो-यात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. काश्मीरमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्यास याचा परिणाम जम्मू आणि लडाखवर होईल. गेल्या 70 वर्षांपासून काश्मीर मुद्द्यावर चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.