काळासोबत एसटीचंही परिवर्तन, नवी स्टील बस लवकरच रस्त्यावर धावणार!
मुंबई, दि. 12 - एसटी महामंडळानं आपली परिवर्तन बस एका वेगळ्या स्वरुपात आणण्याचा निर्णय घेतला आहे. स्टील बांधणीची परिवर्तन बस लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे. दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत बांधण्यात आलेली ही बस सध्या प्रायोगिक तत्वावर रस्त्यावर धावणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्टील बांधणीच्या परिवर्तन बसची घोषणा केली होती. याआधी एसटी बस अल्यूमिनियम बांधणीची होती. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत आता ही बस स्टीलमध्ये बांधण्यात येईल. अल्यूमिनियमच्या बस वजनाने हलक्या होत्या, तसंच अपघातामध्ये होणार्या बसच्या नुकसानीची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे मजबूत आणि दणकट अशा माइल्ड स्टीलमध्ये नव्या एसटी बसची बांधणी करण्यात आली आहे. या नव्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं अनेक बदल करण्यात आले आहेत. या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आल्याचं एसटी महामंडळानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.