पुणे, सांगली, चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस
पुणे, दि. 07 - भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. रात्री पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. घरांचे पत्रेही उडाले आहेत. कोकणात चिपळूणमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. सांगलीतही ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे.