Breaking News

शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञान वाढीसाठी शैक्षणिक सहल अथवा ग्रामीण पर्यटनाला मान्यता

मुंबई, दि. 24 - राज्यातील सर्व माध्यमांच्या तसेच सर्व मंडळाशी संलग्नित शाळांतील इयत्ता 5 ते 10 मधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक,भौगोलिक, सांस्कृतिक आणि  शैक्षणिक विषयाच्या ज्ञान वाढीसाठी शैक्षणिक सहल अथवा ग्राम पर्यटनाला मान्यता देण्यात आली आहे.
विदयार्थ्यांना शैक्षणिक सहल अथवा ग्राम पर्यटनाच्या वेळी ऐतिहासिक,भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक माहिती मिळावी, तसेच त्या गोष्टी प्रत्यक्ष पाहण्याची संधी  मिळावी यासाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये एक शैक्षणिक सहल अथवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यास शाळांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र अशा सहलीच्या  आयोजनासाठी विदयार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये. सहलीमध्ये सहभागी होण्याकरिता संबंधित पालक आणि विदयार्थ्यांची संमती असणे  आवश्यक असणार आहे.