नाशिक शहरातील गडकरी चौकात पहाटे भीषण अपघात; तीन ठार
नाशिक, दि. 27 - नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील गडकरी चौकात आज पहाटे पाचच्या सुमारास दोन कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर इतर पाच जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बीएमब्लू एम एच 01 एल 7931 ने स्विफ्ट कार एम एच 15 डीसी 0527 ला जोरात धडक दिली. अपघातानंतर बीएमब्लू चालक फरार झाला आहे.अपघात इतका भयंकर होता की, परिसरात प्रचंड मोठा आवाज झाला तसेच दोन्ही कारचा या अपघातात चेंदामेंदा झाला. अपघातातील पाचही जखमींवर सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातात योगिनी लीलाधर भामरे (19), सरिता लीलाधर भामरे (35 रा. मूळ जळगाव), या सह रेखा प्रकाश पाटील(मावशी) (वय 33, रा मुंबई) या तिघी ठार झाल्या आहेत तर लीलाधर भामरे गंभीररित्या जखमी आहेत.
अपघातात योगिनी लीलाधर भामरे (19), सरिता लीलाधर भामरे (35 रा. मूळ जळगाव), या सह रेखा प्रकाश पाटील(मावशी) (वय 33, रा मुंबई) या तिघी ठार झाल्या आहेत तर लीलाधर भामरे गंभीररित्या जखमी आहेत.