Breaking News

बाहुबली 2 ची घोडदौड, 10 दिवसात 1 हजार कोटींचा पल्ला ओलांडला!

मुंबई, दि. 08 - ‘बाहुबली 2’ चित्रपटाने देशविदेशातील सिनेरसिकांनाही वेड लावत 10 दिवसात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या आठवड्यात ‘बाहुबली 2’ ने 860 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘बाहुबली 2’ हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. दहा दिवसांमध्ये 1000 रुपयांचा गल्ला ‘बाहुबली 2’ नं जमवला आहे.
‘बाहुबली 2’ चा 10 दिवसात भारतासह जगभरातील कमाईचा आकडा 1000 कोटींच्या पार गेला आहे. यामध्ये भारतात 800 कोटी रुपये तर भारताबाहेर 200 कोटी कमाई ‘बाहुबली 2’ नं केली आहे. पहिल्या आठवड्याच्या कमाईत बाहुबली 2 ने सलमानच्या सुलतानचा रेकॉर्ड मोडला होता. सुलतानने पहिल्या आठवड्यात 208.82  कोटींची कमाई केली होती.