कुलभूषण जाधव प्रकरणावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 मे रोजी सुनावणी
नवी दिल्ली, दि. 11 - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती. पुढील सुनावणीदरम्यान पाकिस्तान काय भूमिका मांडणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतरही पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय हा भारतासाठी मोठा विजय मानला जात आहे. कारण भारताने तब्बल 16 वेळा कुलभूषण जाधव यांच्याशी काऊन्सिलर अॅक्सेस देण्यासाठी विनंती केली होती. मात्र पाकिस्तानने ही मागणी फेटाळली. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया महत्वाची आहे. कुलभूषण जाधव यांना भेटण्याचीही परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. जगभरात या कायदेशीर बाबी पाळल्या जातात. त्यामुळे यावर पाकिस्तान काय बाजू मांडणार ते महत्वाचं असेल.