चिचोंडी पाटीलमध्ये रंगला कुस्त्यांचा फड
अहमदनगर, दि. 20 - राज्यातील नामवंत मल्लांनी जिगरबाज खेळ, कसब, चलाखी दाखवत पंचक्रोशीतील प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कोल्हापुर, सातारा, पुणे, बीड, उस्मानाबाद, सोलापुर, लातूर येथील नामवंत मल्लांनी चिचोंडी पाटील ( ता. नगर ) येथील यात्रेत कुस्त्यांच्या हगाम्यात आपल्या चमकदार खेळाने मैदान गाजवले. बुधवारी दुपारी तीन वाजता माळीवाडा परीसरात वाळूच्या मळ्यात भरवलेल्या या हगाम्यात यात्रा कमेटी सदस्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
या वेळा गावात कुल्ती हगाम्यासाठी आलेल्या पै-पाहुण्यासह मल्लांनी गावाच्या वांग- भाकरीचा प्रसादाचा अस्वाद घेतला. या प्रसादाची व्यवस्था संजयपवार, संतोषकोकाटे, प्रकाशठोंबरे, जानू तनपुरे यांनी पाहीली.
प्रारंभी गावातील नामवंत मल्ल कै.रामराव दादा पवार यांच्या स्मरणार्थ मानाच्या कुस्त्या उपसरपंच शरद पवार, महेश जगताप पाटील, संदिप सुरवसे, प्रभाकर हजारे, यांच्या हस्ते लावण्यात आल्या. पंच म्हणून तुळशीराम कोकाटे, बाजीराव हजारे, राजू कोकाटे,संतोष खराडे यांनी काम पाहीले.
सायंकाळी गामस्थांच्या मनोगंजनासाठी पुणे येतील सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात्रा कमेटी सदस्य कल्याण ठोंबरे, दत्ता हजारे, दिलीप कांकरिया, शशिकांत पावर यांनी परीश्रमघेतले.