Breaking News

माणसाबरोबर पक्ष्यांसाठी ही पाण्याचा विचार करणे ही चांगल्या संस्काराची ओळख

अहमदनगर, दि. 20 - वाढत्या शहरीकरणामुळे आज हिरवढ कमी होत चालली आहे. दिवसेंदिवस रोजगाराच्या शोधात लोक शहराकडे वळायला लागले आहे व त्यामुळे त्यांना राहण्यासाठी शहरीभागात वृक्षतोड करुन बांधकामाचे प्रमाण वाढत चालले आहे व यामुळे प्रत्येकवर्षी उष्णता वाढत चाललेली आहे व माणासाला पिण्यासाठी पाण्याची गरज भासत असल्यामुळे त्यांना पाणपोईचा सहारा मिळत आहे. पण त्याच बरोबर अहमदनगर सोशल कल्बने पक्ष्यांसाठी पाणी पिण्याचा विचार करणे ही एक चांगल्या संस्काराची उधारण असल्याचे प्रतिपादन युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते अनवर सय्यद यांनी केले.
अहमदनगर सोशल क्लब व रामचंद्र खुंट युवक मंडळाच्यावतीने रामचंद्रखुट येथे पक्ष्यांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणुन परिसरताील राहिवासी, दुकानदार व नागरीकांना पाणी ठेवण्यासाठी कुलहडचे वापट करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरुन अनवर सय्यद बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक फय्याज मेंम्बर, राजुभाई शेख, इमरान हाजी अन्वरखान, मुबीन शेख, कासमभाई केबलवाले, आनंद नांदुरकर, नादीर खान, आदील शेख आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना अनवर सय्यद म्हणाले कि आज आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये माणुस माणसाचा विचार करत नसतांना पक्षांचा विचार करणे परिसरातील व येणार्‍या जाणार्‍या लोकांना प्रोत्साहित करुन त्यांना घराच्या गच्चीवर,झाडावर, मैदानात, स्कुल मध्ये जेथे शक्य होईल तेथे पक्षांयाच्या पाणी पिण्याची व्यवस्था करण्याचे कार्य कौतुकास्पद असून प्रत्येक सामाजिक संघटनांनी याचे अनुकारण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
अहमदनगर सोशल कल्बचे प्रमुख नईम सरदार यांनी प्रस्तविक करताना उदिष्ट स्पष्ट करुन कल्बतर्फे केल्या जाणार्‍या विविध कार्याचा आढावा घेतला. सुत्रसंचालन शफाकत सय्यद यांनी केले. तर आभार जावेद मास्टर यांनी मानले. कार्यकम यशस्वितेसाठी जावेद तांबोळी, तनवीर चष्मावाला, सय्यद शरीफ, सानिया नईम, पै.मोसिम शेख, फजल खान व रामचंद्र खुट युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.