Breaking News

उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा

लखनौ, दि. 23 - उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला होणार असल्याचा इशारा मध्य प्रदेशातील गुप्तचर विभागाने दिला आहे. लहान वयाच्या मुलांना दहशतवादी हल्ला करण्यासाठी साधूचे वेश धारण करुन उत्तर प्रदेशात पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी रेल्वे स्थानकावर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
या दहशतवाद्यांना हिंदू धर्माचे चालिरिती शिकवून साधूंच्या वेशात येथे पाठविण्याचा कट रचण्यात येत असून 12 सप्टेंबर 20114मध्ये बिजनौरमध्ये झालेल्या स्फोटातील आरोपी खंडवा तुरुंगातून फरार झालेले दहशतवादीही याच प्रकारे साधूंता वेश धारण करत होते, अशी माहिती पोलिसांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केली आहे.