Breaking News

राहुल गांधी व स्मृती इराणी यांच्यात ट्विटयुद्ध

नवी दिल्ली, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदाहरण देऊन एखादी गोष्ट स्पष्ट करणे अधिक योग्य असते, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधानांवर टीका केली आहे. त्यावर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवरूनच प्रत्त्युत्तर दिले आहे. पहा हे कोण म्हणत आहे, असे इराणी यांनी म्हटले आहे. स्वत:च्या प्रचारासाठी समाज माध्यमांचा वापर करू नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशासकीय अधिका-यांना दिल्या. त्यावर राहुल गांधी यांनी आज टीका केली. जलद निर्णय घेण्याच्या परिणामांमुळे अधिकार्‍यांनी घाबरून जाऊ नये. कारण जनहितासाठी ईमानदारीने निर्णय घेणार्‍या अधिकार्‍यांच्या पाठीशी जनता उभी राहिल, असेही पंतप्रधानांनी म्हटले होते.