Breaking News

मेरठ लखनऊ राज्यराणी एक्सप्रेस रुळावरुन घसरली

रामपूर, दि. 15 - मेरठ लखनऊ राज्यराणी एक्सप्रेसला अपघात झाला. रामपूरजवळ हा अपघात झाला. काही वेळापूर्वी रामपूर आणू मुंडणपन्डाजवळ कोशी नदीच्या पुलावर दुर्घटना ही घडली. मदत कार्य वेगानं सुरू आहे. या अपघातात 10 जण जखमी झाले.
ट्रेनचे 8 डबे रुळावरून घसरल्याने ही दुर्घटना घडली आहे. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. सुदैवाने या अपघातात कुणीही फारसं जखमी झालं नाही.