शेवगांव पंचायत समितीने कर्जमाफीचा ठराव घ्यावा
अहमदनगर, दि. 21 - गेल्या चार ते पाच वर्षांत शेवगाव तालुक्यात पडलेल्या दुष्काळाने शेतकरी कर्जबाजारी झाल्याने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी व शेतमाला योग्य हमीभाव शासनाने द्यावा, असा ठराव शेवगाव पंचायत समितीने करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीनीेंही कर्जमाफी व शेतमालाला हमी भावाचे ठराव महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत घ्यावेत, असे आवाहन फुंदे यांनी केले आहे. शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, उपसभापती शिवाजी नेमाणे, गटविकास अधिकारी शाम गोडभरले आदींना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फुंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन देत याप्रश्नी चर्चा केली. शेवगाव तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली आहे. त्यातच शेतकर्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात, हे दुर्दैव आहे. शासनाचे याप्रश्नी दुर्लक्ष होत आहे. नेवासा (नगर) व गेवराई (बीड) येथील पंचायत समितीने कर्जमाफी व हमीभावाचे ठराव घेऊन शासनाला पाठविले आहेत. त्याच धर्तीवर शेवगाव पंचायत समितीनेही, असा ठराव करावा, अशी मागणी दत्तात्रय फुंदे यांनी केली. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनाही या बाबतचे निवेदन पाठविण्यात आले असून, महाराष्ट्र दिनी (दि. 1 मे) ग्रामसभेत कर्जमाफी व हमीभावाचे ठराव करण्याबाबत त्यांच्याशी संपर्क करून चर्चा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, संदीप ढाकणो, बाळासाहेब फटांगडे, भीमराज भडके, शेषनारायण नाईक, अमोल नेमाणो, संदीप तेलोरे, मच्छिंद्र गावडे आदींनी सहभाग घेतला.गेल्या चार ते पाच वर्षांत शेवगाव तालुक्यात पडलेल्या दुष्काळाने शेतकरी कर्जबाजारी झाल्याने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी व शेतमाला योग्य हमीभाव शासनाने द्यावा, असा ठराव शेवगाव पंचायत समितीने करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीनीेंही कर्जमाफी व शेतमालाला हमी भावाचे ठराव महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत घ्यावेत, असे आवाहन फुंदे यांनी केले आहे. शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, उपसभापती शिवाजी नेमाणे, गटविकास अधिकारी शाम गोडभरले आदींना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फुंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन देत याप्रश्नी चर्चा केली. शेवगाव तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली आहे. त्यातच शेतकर्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात, हे दुर्दैव आहे. शासनाचे याप्रश्नी दुर्लक्ष होत आहे. नेवासा (नगर) व गेवराई (बीड) येथील पंचायत समितीने कर्जमाफी व हमीभावाचे ठराव घेऊन शासनाला पाठविले आहेत. त्याच धर्तीवर शेवगाव पंचायत समितीनेही, असा ठराव करावा, अशी मागणी दत्तात्रय फुंदे यांनी केली. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनाही या बाबतचे निवेदन पाठविण्यात आले असून, महाराष्ट्र दिनी (दि. 1 मे) ग्रामसभेत कर्जमाफी व हमीभावाचे ठराव करण्याबाबत त्यांच्याशी संपर्क करून चर्चा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, संदीप ढाकणो, बाळासाहेब फटांगडे, भीमराज भडके, शेषनारायण नाईक, अमोल नेमाणो, संदीप तेलोरे, मच्छिंद्र गावडे आदींनी सहभाग घेतला.