अपंग लाभार्थी बस सवलतीपासून वंचीत
बुलडाणा, दि. 20 - 21 मार्च पुर्वी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत अपंग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा हक्क अधिनियमांअतर्गत अपंगाना ओळखपत्र देण्याची सेवा ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर 1 मार्च पासुन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अपंगानी सदरच्या वेबसाईटवर आपली नोंदणी देखील केली आहे. नोंदणी करुन तब्बल दिड महिन्यानंतर देखील कुठल्याही अपंगाना संगणीकृत पास प्रमाणपत्र देण्यात आले नाही व त्यातच जिल्हा प्रशासनाने देखील मॅन्युअली प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. एकही अपंग शासनाच्या कुठल्याही योजनेपासुन वंचित राहता कामा नये असे स्पष्ट शासनाचे आदेश असतांनाही अपंग प्रमाणपत्राच्या मुदत संपलेल्या आहेत अशा हजारो खर्या अपंगांना सदरच्या एस.टी.बसच्या सवलतीपासुन वंचीत रहावे लागत आहे. त्यातच अधिकचा त्रास व आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनाने वेळीच दखल घेवुन वंचीत अपंगांना तात्पुरत्या स्वरुपाचे एक किंवा दोन महिन्याचे अपंग प्रमाणपत्र वितरण करावे अशी मागणी अपंग बांधवाकडून होत आहे.