Breaking News

गुगलसम्राट सुंदर पिचाईंचं वेतन जगात अव्वल

मुंबई, दि. 30 - जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या सीईओचा पगार किती असेल, याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? गुगलचे सम्राट सुंदर पिचाई यांचा पगार तुमच्या कल्पनेच्याही पल्याड असून शकतो. पिचाई यांचा वार्षिक पगार तब्बल 200 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1285,51,00,000 (12.85 अब्ज) रुपये आहे. म्हणजेच त्यांना महिन्याला तब्बल एक अब्ज रुपये पगार मिळतो.
वेतन म्हणून इतकी मोठी रक्कम असलेले सुंदर पिचाई हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत. सुंदर पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट 2015 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली होती. 2016 मध्ये त्यांना 198.7 मिलियन डॉलर म्हणजे
12.77 अब्ज रुपयांचे शेअर्स मिळाले होते. 2015 च्या तुलनेत पिचाई यांचे शेअर्स दुपटीने वाढले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, गुगलच्या अनेक उत्पादनांचं यशस्वी लाँचिंग झाल्यामुळेच सुंदर पिचाई यांची सीईओ पदावर बढती झाली आणि वेतनवृद्धी समितीनं त्यांना जबरदस्त पगारवाढ दिली आहे.